TANUSHRI PANCHAL's profile

ILLUSTRATION : CALENDER ( HINDU ALMANC )

ILLUSTRATION : CALENDER ( HINDU ALMANC )
Marathi months, known as "Maas," are intricately intertwined with both agricultural cycles and religious observances, shaping the cultural fabric of the Marathi community.
    Marathi months are deeply rooted in tradition and festivities, aligning with agricultural cycles and religious rituals. Each month holds significance, reflecting cultural practices and celebrations passed down through generations. From the auspicious Gudi Padwa in Chaitra to the vibrant and colourful Holi in Phalgun. Marathi months are imbued with rich cultural heritage and spiritual significance. Throughout the year, Marathi months encapsulate the essence of tradition, spirituality, and community bonding, fostering a sense of belonging and cultural pride among the people of Maharashtra.
हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राच पृथ्वी भोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे नाव आणि महत्व निराळे आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जाते.जेष्ठात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. आषाढात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. 
श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा साजरी केली जाते.भाद्रपदातिल पौर्णिमेला पितरांचे श्राद्ध करतात. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस त्रिपुरी पूर्णिमा असे म्हणतात. मार्गशिर्षातिल पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस विष्णूची पूजा केली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तीर्थस्नानाचे महत्व आहे.,आणि फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस होळी पौर्णिमा असे म्हणतात व या दिवशी होळीचा सण साजरा करतात.
चैत्र

चैत्र हा हिदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला (गुढी पाडव्याला) सुरू होतो. चैतन्य आणि नवीन उभारी देणारा महिना म्हणजे चैत्र .चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. सगळीकडे आंबेमोहराचा वास दरवळत असतो. चैत्र महिन्यात उन्हाचे प्रमाण वाढते, वातावरणातील उष्मा वाढायला सुरुवात होते, पण या महिन्यात निसर्गातील बदल इतके आल्हादायक असतात की, मन प्रसन्न होतेच.
वैशाख

हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातील हा दुसरा महिना आहे.चैत्रामध्ये सुरू झालेले ऊन वैशाख महिन्यामध्ये आणखी वाढत जाते. सगळीकडे हवा खूप गरम आणि कोरडी असते .त्यामुळे या दिवसात उकाडा खूप वाढत जातो. या दिवसात या गरम हवेलाच वैशाख वणवा असेही म्हटले जाते. या दिवसात ज्वारी , गहू इत्यादी पिके तयार होतात.या महिन्यातील पौर्णिमेला ' बुद्ध पौर्णिमा ' साजरी केली जाते.
ज्येष्ठ

ज्येष्ठ म्हणजे हिंदू कालगणनेप्रमाणे आणि आपल्या मराठी वर्ष गणनेप्रमाणे जेष्ठ हा वर्षातला तिसरा महिना आहे. कडक उन्हामुळे वर्षभरात लागणारे पापड , कुरडया, पापड्या,यांची वाळवणे उरकून त्यांची पण साठवण केली जाते. सूर्याच्या उन्हाने खूप तापलेली धरती आणि आपण मानव प्राणीसुद्धा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. या महिन्यात उकाडा अगदी असह्य होत असतो.
आषाढ

आषाढ हा हिंदू पंचांगा प्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. मृगाचा पाऊस पडून गेल्यावर शेते बऱ्यापैकी ओली होतात.चिखलणी केलेल्या शेतामध्ये जमीन ओली झालेली असल्यामुळे बळिराजा बी पेरतो. शेतीच्या कामाचा उरक असताना पंढरपूरच्या त्या  विठ्ठल दर्शनाची ओढ गावकऱ्यांना लागते. संपूर्ण महारा्ट्रातील वारकरी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची वारी करतात.
श्रावण

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे महत्व आहे. चतुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे. आषाढी अमावस्येला दिव्याची आवस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरूवात करण्यात येते. यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन – पावसाचा खेळ श्रावणामध्ये सुरू होतो. 
भाद्रपद

हिंदू कालगणनेतील सहावा महिनाशुद्ध चतुर्थीला वरद किंवा गणेश चतुर्थी म्हणतात या दिवशी गणेशाची मातीची बनविलेली मूर्ती घरात आणून पूजा करावीअसे सांगितले आहे. या दिवसापासून अनंत (शुद्ध) चतुर्दशीपर्यंत विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करतात.
अश्विन

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अगदी विजया दशमीपर्यंत येणाऱ्या शारदीय नवरात्र आणि विजया दशमी या दहा दिवसांमध्ये "या देवी सर्व भुतेशू शक्तीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:"  अशी शक्तिमातेची उपासना केली जाते. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. पावसाळा संपत आल्यामुळे नवरात्राच्या वेळेला हवेमध्ये किंचित गारठा आलेला असतो आणि हवा अतिशय आल्हाददायक आणि मोहक असते.शेतामध्ये पण धनधान्य भरपूर प्रमाणात तयार झालेले असते त्यामुळे एक प्रकारचा हर्ष आणि उल्हास सर्वत्र पसरलेलाअसतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मनसोक्त आनंद अनुभवत दिवाळीची चाहूल लागते. वसुबारस ते भाऊबीज अशी दिवाळी साजरी केली जाते. रोषणाई, फराळ, नवनवीन वस्तू व काड्यांची खरेदी याची चंगळ सुरू असते.
कार्तिक

कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. या महिन्यात गावाकडील मंदिरांमध्ये देवदिवाळी साजरी करण्यात येते. मंदिरे सजवून दीपमाळ दिव्यांनी उजळुन निघते. तुळशी विवाहनंतर लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू होतात.
मार्गशीर्ष

मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे. यालाच अग्रहायण किंवा अगहन असेही म्हटले जाते. या महिन्यात स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवार चा व्रत करून महालक्ष्मीची पूजा करतात. कुटुंबातल्या सदस्यांसाठी धनाच्या आणि यशाच्या प्रगतीची, भरभराटीची प्रार्थना करतात.
पौष

भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण- समारंभ साजरे केले जातात. त्याचप्रमाणे मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरेऊसबोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात/सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. मकर संक्रांती हा सामाजिक सण आहे. हा सण रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडीवांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.
माघ

माघ हा हिंदू पंचागानुसारही वर्षातला अकरावा महिना आहे. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये "अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे" स्मरण आहे. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात.महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूधतूपशेणगोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्क थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
फाल्गुन

फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातील शेवटचा महिना. या महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखत असत. होलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचे हे केलेलं पूजन होय. होळी म्हणजे प्रज्वलित अग्नी. हा होलिकोत्सव म्हणजे सर्व वाईट गोष्टींचा नाश. या वर्षातील सर्व जुनेपाने, वाईट अनुभव, वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायच्या, भस्मसात करायच्या असाही दृष्टिकोन या सणाच्या बाबतीत ठेवायला हरकत नाही. संपूर्ण वर्षातील चांगले जतन करायचे वाईटाची आहुती द्यायची. हा अग्नी सर्व वाईट आत्मसात करतो त्यांचा नाश करतो. अशुद्ध वातावरण शुद्ध करतो. प्रदूषण नाहीसे करतो.
THANK YOU 
ILLUSTRATION : CALENDER ( HINDU ALMANC )
Published:

Owner

ILLUSTRATION : CALENDER ( HINDU ALMANC )

Published: